पांडवकडा धबधब्यावर यंदाही बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2024
- 192
नवी मुंबई ः पावसाळा सुरु झाला की खारघर शहराच्या कुशीतून धो धो वाहणारा पांडवकडा मुंबईसह उपनगरातील पर्यटकांना खुणावू लागतो. मात्र येथे घडणाऱ्या अपघातांमुळे पर्यटकांना बंदी घातली जाते. यंदाही या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून वन खात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. यंदाही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. वनविभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच याठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पर्यटकांच्या जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना देखील पत्र लिहणार असल्याची माहिती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी देविदास सोनावणे यांनी सांगितले.
- याठिकाणीही बंदी
गाढेश्वर डॅम, गाढी नदी पात्राजवळील धबधबे याठिकाणी बंदी असणार आहे. दरवर्षी या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. कर्नाळा अभयारण्यात करता येणार निसर्ग पर्यटन शहरातील महत्वाची ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली गेली असली तरी कर्नाळा अभयारण्यासारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai