रक्तदान दिनानिमित्त पालिका रूग्णालयात विविध उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2024
- 262
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही दरवर्षी जागतिक रक्तदान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयात वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलभूत रक्तगट प्रणालीचे संशोधक आणि त्यांचे वर्गीकरण करणारे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टेनर यांचा 14 जून हा जन्मदिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रथम संदर्भ रुग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 70 ते 75 थॅलेसेमिया मुले इतर सर्व विभागांव्यतिरिक्त वाशी रूग्णालयातील रक्तपेढीतून नियमितपणे रक्तसंक्रमणचा लाभ घेत आहेत. ‘रक्तदानाची 20 वर्षे साजरी केली : धन्यवाद रक्तदात्यांनो' असे यावर्षीचे रक्तदान दिनाचे घोषवाक्य असून त्यादृष्टीने रक्तदात्यांचे आभार व्यक्त करीत नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली वाशी सार्वजनिक रूग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.यामध्ये, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे रक्तदानाविषयी जनजागृती करण्यात येणार असून महानगरपालिकेच्या रक्तपेढीमध्ये जास्तीत जास्त रक्त जमा करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रक्तदानाला पाठिंबा देण्यासाठी जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai