सिडको अध्यक्षपदी संजय शिरसाट
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 18, 2024
- 444
मुंबई : मंत्रिमंडळात स्थानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची सिडको महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करुन मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. असा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार अशी सातत्याने चर्चा आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे किमान महामंडळावर तरी वर्णी लागावी यासाठी काहीजणांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. त्यातच आता हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली. तर संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदी नेमुन मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे बोलले जाते. शिवाय आगामी निवडणुकीत कोणाची नाराजी नको म्हणून शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
- काय आहे शासन निर्णय?
शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोशिएशन मधील आर्टिकल 202 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन संजय शिरसाट, वि.स.स. यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या अध्यक्ष पदावर (मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai