आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2024
- 269
नवी मुंबई : विविध मार्गावर धावणाऱ्या बिगर पावसाळी आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळापत्रकाची 1 नोव्हेंबरपासून अमंलबजावणी केली जाणार आहे. करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनल (22116) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी 4:22 ऐवजी 4:32 मिनिटांनी पोहचणार आहे. 7 नोव्हेेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. त्याचप्रमाणे वास्को द गामा-पटणा (12741) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री 12:35 वाजता असणार आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांंडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी पोहचणार आहे.
- या गाड्यांचा समावेश
लोकमान्य टिळक टर्मिनल-मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी 7:42 वाजता पोहचेल. 1 नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे. एर्नाकुलम जंक्शन-अजमेर (12977), कोचुवेली-पोरबंदर एक्स्प्रेस (20909), भावनगर-कोचुवेली (19260) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (20910) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. - मडगाव-मुंबई दिवाळी विशेष गाडी
दिवाळीच्या सुट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून आता विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 नोव्हेंबर रोजी गोव्यावरून थेट मुंबईसाठी एकमार्गी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी (02052) ही विशेष एकमार्गी गाडी सुरू होणार आहे. या गाडीमुळे कोकणातून मुंबईला परतणाऱ्या, तसेच पर्यटकांची विशेष सोय होणार आहे. ही गाडी सकाळी 8 वाजता मडगाव जंक्शन येथून सकाळी 8 वाजता सुटेल. तर त्याच दिवशी सायंकाळी 7:20 मिनिटांनी ती मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. या गाडीत व्हिस्टा डोमसह एकूण 16 कोच असणार आहे. थिविम, सावंतवाडी रोड,
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai