शाळेच्या स्नेहसंमेलनात विविध घटकांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 14, 2025
- 373
नवी मुंबई : सुयश सामाजिक शैक्षणिक संस्था संचलित शारदा विद्या मंदिर आणि एसव्हीएम इंग्लिश स्कूल या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्याथ गुणगौरव मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या वतीने दरवष या कार्यक्रमात एक आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. ज्यामध्ये समाजातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विविध घटकांना सन्मानित करण्यात येते.
या वष सन 2024 25 करिता सुलेखनकर विलास समेळकाका, महिला कार्यक्षेत्रातून सहा. पोलीस उपनिरीक्षक आशा मोरे, शैक्षणिक सेवा कार्य किसन धोंडीबा जाधव, सामाजिक सेवा कार्य संदीप म्हात्रे, प्रिंट मिडिया आणि सामाजिक सेवाकार्य मिलिंद सपकाळ, गिर्यारोहक अमोल तळेकर, आरोग्य सेवा विभाग विजय पंडे यांना सन्मानित करण्यात आले. तर लाखवड गावच्या कुमारी काजल संकपाळ सीए, कुमारी स्नेहा संकपाळ डॉक्टर व कुमारी अमृता शेलार पोलिस झाल्याबद्दल महिला प्रोत्साहनपर यांनाही गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते महाराष्ट्र हास्य सम्राट जॉनी रावत, जीवनदीप प्रकाशनचे गोरखनाथ पोळ सर, हनुमंत रांजणे साहेब, अपरिचित शिवरायचे शिवव्याख्याते प्रा.रवींद्र पाटील सर, सुरेश शेठ शिंदे, वसंत जाधव, किशोर इथापे, सपोनि रामचंद्र मोरे, भागवत काळे यांच्यासह संस्थेचे सचिव अंकुश संकपाळ, हरीभाऊ संकपाळ मारूती सकपाळ, नितीन हिंगे, नवनाथ चिकणे, किसन शिंदे, विठ्ठल तोरणे व अंकित संकपाळ इ. उपस्थित होते. शंकर गोपाळे यांनी सुत्रसंचलन तर अध्यक्ष रमेश संकपाळ यांनी प्रास्ताविक व मुख्याध्यापिका दिपाली संकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai