सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2025
- 301
नवी मुंबई ः कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 10 मार्च 2025 ते 22 मार्च 2025 या कालावधीत “सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम” नवी मुंबई महानगरपालिका परिसरात अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली 64 पथकांच्या माध्यमातून एकूण 31,803 घरांमध्ये अंदाजित एकूण 1,59,014 लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे क्षयरोगाबाबत व्यापक जनजागृती देखील करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने दररोज कमीत कमी 50 घरांना भेट देऊन माहिती संकलीत होईल अशा प्रकारे पथके तयार करण्यात आलेली आहेत. दोन आठवडयांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयांपेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवरील गाठ या लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास संबंधितांची थुंकी नमुने आणि एक्सरे द्वारे तपासणी करुन अंतिम निदान निश्चित करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या जास्तीत जास्त क्षयरुग्णांचा प्रशिक्षित पथकाद्वारे शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे हे उद्दीष्ट साध्य करण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकी नमुने देऊन उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai