बेवारस वाहने, अनधिकृत फेरीवाले हटवणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2025
- 252
नवी मुंबई : अनेक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने उभी असल्याचे दिसून येतात. त्याचप्रमाणे रस्त्यालगत व पदपथावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बेवारस वाहने, अनधिकृत फेरीवाले व विक्रेते यांच्या विरोधातही मोहीम तीव्र स्वरुपात राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत नवी मुंबई शहराच्या सुनियोजित व्यवस्थापनाबाबत नियमितपणे आढावा घेतला जात आहे. बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होत असून अनधिकृत फेरीवाल्यांमुळेही स्वच्छतेला बाधा पोहचते. या विषयाकडे अधिक गांभिर्याने लक्ष देत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना महानगरपालिका कार्यक्षेत्रात उभी असलेली बेवारस वाहने यांना विभाग कार्यालयांमार्फत सूचना पत्रक बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही बेवारस वाहने त्यांच्या मालकांनी स्वत:हून काढून टाकण्याबाबत अथवा हटविण्याबाबत रिक्षाव्दारे ध्वनीक्षेपकामार्फत जनजागृतीपर सूचना करावी असेही सूचित करण्यात आले आहे. या सूचना पत्रकांचा कालावधी संपुष्टात येताच संबधित विभाग कार्यालयामार्फत ही बेवारस वाहने जप्त करुन टोईंगच्या सहाय्याने क्षेपणभूमी येथे जमा करावीत व त्यावर नियमानुसार पुढील कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
बेवारस वाहने हटविण्याप्रमाणेच अनधिकृत व्यवसाय करणारी वाहने हटविण्याचे व पदपथावर व्यवसाय करुन रहदारीस अडथळा आणणाऱ्या अनधिकृत फेरीवाले व विक्रेते यांच्या विरोधातही मोहीम तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai