नवी मुंबई पालिकेत मेगाभरती
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 376
620 जागांसाठी 11 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील 620 रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार 28 मार्च पासून 11 मे पर्यंत आहे.
नवी मुंबई महापालिकेत 2008 नंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भरतीमध्ये विविध 30 प्रकारच्या 620 कायम जागांसाठी ही भरती होणार आहे. पालिकेतील 3935 पदांच्या 221 संवर्गाच्या आकृतीबंधाला शासनाने 21 ऑगस्ट 2017 रोजीच मंजुरी दिली होती. शासनाकडे सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाल्यानंतर 2008 पासून अनेकजन सेवानिवृत्त झाले तर अनेकांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तसेच विविध पदे व त्यांची संख्या यांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध.
पदे कोणती?
लिपीक- टंकलेखक,लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ नर्स, कनिष्ठ अभियंता, आया, वॉर्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा.
बायोमेडिकल इंजिनिअर,कनिष्ठ अभियंता, उद्यान अधिक्षक,उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी,वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजनिस्ट, डायलिसिस तज्ञ सांख्यिकी सहाय्यक इसिजी तंत्रज्ञ,सेन्ट्रल सर्जिकल सुपरवायजर,आहार तंत्रज्ञ,नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी,आरोग्य सहाय्यक (महिला),ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ,सहाय्यक ग्रंथपाल अशी विविध 30 प्रकारची पदे.
ऑनलाइन अर्जाचे वेळापत्रक
- अर्ज नोंदणी सुरू 28 मार्च 2025
- अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत- 11 मे 2025 ( वेळ रात्री 11.55 मि.पर्यंत )
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत- 11 मे 2025
- ऑनलाइन प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी
- ऑनलाइन परीक्षा - नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai