कोकणातून परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वेगाडी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 139
मुंबई : गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. चिपळूण 8211; पनवेल मेमू अनारक्षित रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
भारतीय रेल्वे गणेशोत्सवानिमित्त 380 विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. कोकण विभाग आणि उर्वरित महाराष्ट्रातून मध्य रेल्वेने एकूण 310 गणपती विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. गणेशोत्सव सुरू झाला असून गणेश विसर्जनानंतर कोकणातून मोठ्या संख्येने प्रवासी परतीचा प्रवास सुरू करतील. त्यामुळे मुंबई येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोकणातून विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01160 चिपळूण पनवेल मेमू अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चिपळूण येथून 3 आणि 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता पनवेल येथे पोहचेल. गाडी क्रमांक 01159 पनवेल चिपळूण मेमू अनारक्षित विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून 3 आणि 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4.40 वाजता सुटेल, ही रेल्वेगाडी त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता चिपळूण येथे पोहचेल. या रेल्वेगाडीला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या रेल्वे स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला 8 मेमू डबे असतील.
गाडी क्रमांक 01131 द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी म्हणजे 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 8.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 01132 द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी 31 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री 11.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीची 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि 2 द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai