अर्बन हाट ते बेलापूर स्टेशन मार्ग धोक्याचा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 16, 2025
- 176
सजग नागरिक मंचाची सिडकोकडे दुरुस्तीची मागणी
नवी मुंबई ः अर्बन हाट ते बेलापूर रेल्वे स्टेशनदरम्यानच्या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र या रस्त्यालगतची भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. या भिंतीचे दोन ठिकाणी भाग ढासळून रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सजग नागरिक मंचाद्वारे सिडकोकडे केली आहे.
आग्रोळी, सेक्टर 30-31 तसेच आयकर कॉलनी परिसरातील नागरिक रोजच्या प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करतात. सजग नागरिक मंचाच्या पाठपुराव्यानंतर केवळ तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र इतक्या कमी कालावधीतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने सिडकोच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्बन हाट ते बेलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या रस्त्यावर सतत नागरिकांची रहदारी सुरु असते. या मार्गावरील भिंत दोन ठिकाणी ढासळली आहे. सातत्याने रेल्वे प्रवासी ये-जा करीत असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. रेल्वे प्रवाशांचा स्पष्ट इशारा आहे की शहराचे शिल्पकार असलेल्या सिडकोने फक्त नवी बांधकामे न करता विद्यमान पायाभूत सुविधांची योग्य देखभाल करावी. अन्यथा हा रस्ता नवी मुंबई महानगरपालिकेकडे तातडीने हस्तांतरित करावा.
बेलापूर रेल्वे स्टेशन इमारतीमधून टॉयलेट ड्रेनेजचे पाणी रस्त्यालगतच्या फुटपाथवर येत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा फुटपाथ अस्वच्छतेचे आगार बनला आहे. बेलापूर स्टेशनच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील पेव्हर ब्लॉक खचलेले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे सिडकोची अनेक कार्यालये याच बेलापूर स्टेशन परिसरात असूनही या समस्या त्यांच्या लक्षात का येत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरंभ शूर असणाऱ्या सिडकोने अर्थपूर्ण हेतूने करोडो रुपये खर्च करून अर्बनहाट प्रकल्प सुरू केला परंतु त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्याने अर्बन हाटची दुरवस्था झाली आहे. अर्बन हाटच्या भिंतींना शेवाळ व गवताने व्यापले आहे. सिडको प्रशासनाने कुंभकर्ण निद्रिस्त अवस्थेतून जागे होत बेलापूर रेल्वे परिसरातील पायाभूत सुविधांकडे जागृतपणे लक्ष द्याव अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai