श्वानांच्या खाऊसाठी वेळ-स्थळ बंधनकारक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 130
नवी मुंबई ः पालिका कार्यक्षेत्रात भटक्या श्वानांचे चावणे, मागे लागणे, लहान मुलांना भीती वाटणे व काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी दररोज श्वानांना खादयपदार्थ टाकणे यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रासाला सानोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी पालिकेने निवडलेल्या ठिकाणी व ठराविक वेळेत श्वानांना खाऊ घालणे बंधनकारक असून याचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात पशू जन्म नियंत्रण कार्यक्रम कायदयाची अंमलबजावणी सुरु असून त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याकरीता 2006 पासून तुर्भे येथे श्वान नियंत्रण केंद्र कार्यरत आहे. भटक्या श्वानांच्या तक्रारी नोंदविण्याकरिता हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये ज्याप्रमाणे प्राण्यांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे प्राणीप्रेमींनी कायदयान्वये जी काळजी घ्यावयाची त्याचीही अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात भटक्या श्वानांचे चावणे, मागे लागणे, लहान मुलांना भीती वाटणे व काही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी दररोज श्वानांना खादयपदार्थ टाकले जात असल्याबाबत विविध स्तरातील नागरिकांमार्फत अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या दि.07/11/2025 रोजीच्या आदेशान्वये स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निवडलेल्या ठिकाणी व ठराविक वेळेत श्वानांना खाऊ घालणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, नमुंमपामार्फत ठरवून देण्यात येणाऱ्या ठराविक ठिकाणांवर, ठराविक वेळेत श्वानांना खाऊ घालता येईल, जेणेकरुन इतर नागरिकांना याचा त्रास होणार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे व प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी असे नवी मुंबई पालिकेने सूचित केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai