सिडको क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 34
पाणी वितरणासाठी स्टेम्ससारखी यंत्रणा उभारण्याचा विचार
नवी मुंबई : सिडको क्षेत्रात सध्या 342 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून 2026 च्या गरजेनुसार एकूण 365 दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे सुमारे 30 दशलक्ष लीटर तूट भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहोत. ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर सिडको क्षेत्रात पाणी वितरणासाठी स्टेम्ससारखी यंत्रणा उभारण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
या संदर्भात विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, खारघर, कामोठे, नवीन पनवेल आणि तळोजा या भागांमध्ये पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. सध्या पातळगंगा, मोरबे, थेटवणे आणि बारवी या स्रोतांमधून सिडकोला 342 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. सिडकोला मोरबे धरणातून सध्या 59 दशलक्ष लीटर पाणी मिळत असून सिडकोने या धरणासाठी पूर्वी 108 कोटी रुपयांचा खर्च केला होता. त्यामुळे या निधीच्या बदल्यात नवी मुंबईकडून सिडकोला 90 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करावा किंवा रक्कम परत करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, खारघर, कामोठे, नवीन पनवेल आणि तळोजा या भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा तुटवडा दूर करण्यासाठी काही तातडीचे उपाययोजना करत आहोत. पहिला उपाय हा आहे की मोरबे धरणात 100 दशलक्ष लीटर पाणी शिल्लक आहे. ते पाणी नवी मुंबईने डिसेंबर पर्यंत सिडकोला उपलब्ध करून देण्यात यावे हा निर्णय घेतला पाहिजे. हे पाणी उपलब्ध झाल्यास तात्काळ तूट दूर करता येईल. जेएनपीटीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या दिले जाणारे 14 दशलक्ष लीटर पाणी सिडकोकडे वळविण्याचा निर्णयही आगामी कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच न्हावा शेवा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यातून सिडकोला सुमारे 69 दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे या भागातील भविष्यकालीन लोकसंख्या आणि सध्या लागणारा पाण्याचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, विविध उपायांमुळे सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा स्थिती सुधारेल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी ऑटोमेशन प्रणाली लागू करण्याचा विचार असून, सिडको करत असलेला पाणीपुरवठा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरणासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai