प्रलंबित पाणीपट्टी देयके भरण्याचे सिडकोचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 35
नवी मुंबई ः सिडको प्रशासनिक क्षेत्रातील ज्या ग्राहकांची पाणीपट्टी देयके प्रलंबित आहेत त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत थकीत देयकांचा भरणा करण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले असून, विहित मुदतीमध्ये प्रलंबित देयकांचा भरणा करण्यास असमर्थ ठरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सिडको प्रशासनिक क्षेत्रातील गावांना आणि नोडना सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा नियमित आणि अखंडित करण्यासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यासाठी ग्राहकांनी पाणीपट्टी देयकांचा भरणा वेळेवर करणे आवश्यक आहे. याकरिता ज्या ग्राहकांची पाणीपट्टी देयके प्रलंबित आहेत त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन सिडकोने केले आहे. विहित मुदतीत थकलेली पाणी देयके न भरल्यास संबंधित ग्राहकांवर, सिडकोच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करून त्यांचा पाणी पुरवठाही खंडित होऊ शकतो, असा इशार देखील सिडकोतर्फे देण्यात आला आहे. ग्राहकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने, अधिकृत संकलन केंद्रांवर किंवा सिडको कार्यालामध्ये भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai