नवी मुंबई विमानतळवरुन 46 देशांतर्गत सेवा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 27
पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर
नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळावरुन 30 नवीन शहरांना उड्डाणसेवा सुरु करण्यात येणार आहे. 29 मार्च पासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. एनएमआयएने आपले पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या तीन एअरलाइन्स अतिरिक्त फ्लाइट्स चालवतील, ज्यामुळे प्रवासी क्षमता आणि नेटवर्कमध्ये वाढ होणार आहे.
डिसेंबर 2025 मध्ये व्यावसायिक कार्यचालन सुरू झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता प्रवासी क्षमता वाढवण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपले पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. 29 मार्च ते 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू होणाऱ्या या वेळापत्रकामुळे विमानतळाचे देशांतर्गत नेटवर्क विस्तारणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत या विमानतळावरून 30 नवीन हवाई मार्गांची भर पडणार असून, यामुळे एकूण 46 देशांतर्गत शहरांशी नवी मुंबई थेट जोडली जाईल. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात दिवसाला 22 असलेल्या विमान फेऱ्यांची संख्या आता थेट 78 वर पोहोचणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. भारतातील दिल्ली (9), गोवा (7), बेंगळुरू (6) आणि कोचीन (5) या शहरांतून सर्वाधिक दैनंदिन उड्डाणे होतील. यानंतर हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, वाराणसी आणि इंदौर या शहरांचा क्रमांक असेल. या काळात व्यापारी, पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे नवी मुंबईशी जोडली जातील. साप्ताहिक स्तरावर विमान फेऱ्यांची संख्या 1,092 इतकी राहण्याचा अंदाज असून तसेच सरासरी दररोज 156 फेऱ्या होतील. मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने ही मोठी झेप मानली जात आहे. नवी मुंबई विमानतळावरुन सेवा सुरु होणाऱ्या या 30 शहरांमध्ये राजकोट, हुबळी, जबलपूर, भावनगर, भोपाळ, तिरुवनंतपुरम, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, आग्रा, बेळगाव, दिऊ, दुर्गापूर, गोवा, गोरखपूर, हिंडन आणि विशाखापट्टणम, चंदीगड, डेहराडून, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, श्रीनगर, तिरुपती, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर यांचा समावेश आहे.
या विस्तारामुळे प्रथम व द्वितीय श्रेणीच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि भारतातील सर्वात मोठे नागरी व आर्थिक केंद्र मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) वाढत्या प्रवासी मागणीला मोठा आधार मिळेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai