फेडरल बँकेचे महाराष्ट्रात विस्तारीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 29
मुंबई : फेडरल बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात मुंबई विभागात आपल्या शाखांची संख्या 116 वरून 126 पर्यंत वाढवली आहे. हा विस्तार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर यासारख्या प्रमुख वित्तीय शहरांमध्ये करण्यात आलेला आहे. उच्च-वृध्दी असलेल्या शहरी आणि निम-शहरी भागांत आपले अस्तित्व अधिक सक्षम करण्यावर बँक देत असलेला भर या विस्तारीकरणातून स्पष्ट झाला आहे.
बँकेने नव्याने सुरु केलेल्या या शाखा सुलभता वाढवणे, ग्राहकांशी अधिकाधिक संपर्क वाढवणे आणि महाराष्ट्रातील ग्राहक तसेच व्यवसायांच्या बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आणखी 10 नवीन शाखा उघडण्याची बँकेची योजना आहे. या विस्तारीकरणामुळे या विभागात एकूण शाखांची संख्या 136 वर जाईल. अतिशय सक्षम आणि ग्राहकांना चटकन जाणवारी उपस्थिती त्याचबरोबर प्रगत डिजिटल क्षमता यांचा मेळ घालून ग्राहकांना विनाव्यत्यय विविध माध्यमांतून (ओम्नी-चॅनेल) बँकिंग सेवा आणि अनुभव देण्याच्या उद्दीष्टावर हे विस्तारीकरण धोरण आधारलेले आहे.
बँकेच्या कंझ्युमर बँकिंग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख विराट दिवाणजी म्हणाले, “आमची वाटचाल नेहमीच प्रगती ही स्थिर, सहेतुक आणि विश्वासावर आधारलेली असली पाहिजे, या सरळसोप्या विश्वासावर आधारलेली आहे. आम्ही विस्तारीकरण करत असलेल्या या भौगोलिक बाजारपेठा नव्या भारताची ऊर्जा आणि उद्यमशीलतेचे प्रतिनिधित्व करतात. बँकेच्या विस्तारीकरणाचे हे धोरण प्रामुख्याने शाश्वत विकास, भक्कम पाया आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पनांवर आधारलेले आहे. बँकेचे प्रत्यक्ष शाखांचे जाळे तिच्या डिजिटल सामर्थ्याला पूरक ठरणार आहे आणि सर्व भौगोलिक बाजारपेठांमध्ये ग्राहकांना सातत्याने अधिकाधिक मूल्याधारित सेवा प्रदान करण्याची खात्री हे धोरण देते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai