आर्म उड्डाणपूलाचे लोकार्पण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 23
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने वाशी से.17 येथे पामबीच मार्गावरुन पुण्याकडे जाण्याकरिता सायन पनवेल महामार्गापर्यंत उड्डाणपूल आर्मचा लोकार्पण समारंभ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
नवी मुंबईतून पामबीच रस्त्यावरुन पुण्याकडे जाण्यासाठी बनविण्यात आलेला जोडरस्ता हा अत्यंत उपयोगी आहे. नवी मुंबई शहराच्या रचनेमधील त्रुटी दूर करणारा हा प्रकल्प असल्याचे सांगत शहर अंतर्बाह्य सुंदर दिसण्यासाठी यापुढील काळात काम केले जाईल असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी आर्म उड्डाणपूलावरून पहिला प्रवास दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या दुचाकी वाहनाव्दारे वैभव ठाकूर यांनी केला. मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आर्म उड्डाणपूल बांधकामाशी संबधीत कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौडे, उपअभियंता अमित पावरा, कनिष्ठ अभियंता रोहित पिंपळे तसेच वास्तुविशारद व कंत्राटदार यांच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
पामबीच मार्गावरुन सायन पनवेल महामार्ग पर्यंत जाण्यासाठी से.17, वाशी येथे 18 कोटी 32 लक्ष रक्कम खर्च करुन 290 मी. लांबीचा व 6.50 मी. रुंदीचा आर्म उड्डाणपूल बांधण्यात आला असून यामुळे वाशी पामबीच सिटी बँक जवळील चौकातून थेट सायन पनवेल महामार्गावर जाणे सोपे होणार आहे. सध्या पामबीच मार्गावरुन सायन पनवेल महामार्गावर जाण्यासाठी सानपाडा येथून मोठा वळसा घालून जावे लागत असून या आर्म उड्डाणपूलामुळे नागरिकांचा 10 ते 15 मिनिटांचा वेळ वाचून इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूकीच्या नियोजनासाठी ही मोठी उपलब्धी आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai