स्थायी समितीकडून नवी मुंबईकरांचा अपेक्षाभंग
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 24
आयुक्तांनी सादर केलेले बहुतांश आकडेस्थायीच्या अंदाजपत्रकात तसेच
नवी मुंबई ः पालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केल्यावर समिती सदस्य सागर नाईक यांनी आता अर्थसंकल्प आम्ही बनवू अशी बताई केली होती. चार दिवस पालिका अधिकाऱ्यांची परेड केल्यानंतर पालिकेच्या जमा बाजुस कोणताही ठोस पर्याय देण्यास अपयशी ठरल्याचे त्यांनी सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अंदाजपत्रकावरुन दिसत आहे.
पालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रकातील आकडे 99 टक्के तसेच असल्याचे सदर अंदाजपत्रकावर नजर टाकली असता दिसून येते. स्थायी समितीने अभियांत्रिकी सेवा सुविधामध्ये 30 कोटी, उपकरात 50 कोटी, पाणीपुरवठा विभागात 25 कोटी, नगररचना विभागात 70 कोटी, परवाना विभागात 25 कोटींची जमा सुचवली असून त्यात वित्त आयोगाच्या अनुदानात 29 कोटींचे उत्पन्न गृहित धरले आहे. त्याचबरोबर 400 कोटींचे कर्जरोखे व 100 कोटींचे कर्ज उत्पन्नाच्या बाजुस दाखवून आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात 729 कोटी रुपयांच्या उत्पन्नात वाढ दर्शवली आहे. गेली अनेकवर्ष नगररचना विभाग वगळता इतर सर्व विभागांनी उत्पन्नात भरीव कामगिरी दाखवलेली नसताना स्थायी समितीने संबंधित विभागावर दाखवलेला विश्वास अनाकलनीय आहे. त्याचबरोबर कर्जरोख्यांच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवणे आणि त्याअनुषंगाने खर्चाच्या बाजुला मोठमोठे प्रकल्प दाखवणे हा उंटावरुन शेळी हाकण्याचा प्रकार आहे. कर्जरोख्यांना शासनाची मंजुरी मिळणे आणि त्यानंतरच कर्जरोखे बाजारात आणणे ही मोठी प्रक्रिया असून त्याला या आर्थिक कालावधीत मंजुरी मिळणे शक्य नसताना 400 कोटींचे कर्ज उत्पन्न म्हणून गृहित धरणे आश्चर्यकारक आहे.
स्थायी समितीने उत्पन्नाच्या वाढीसाठी कोणताही ठोस उपाय या अंदाजपत्रकात सुचवला नसल्याने नवी मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे. दोनवेळा महापौरपद भुषवणारे सागर नाईक आणि त्यांच्या जोडीला अनेकवेळा निवडून येणारे दिग्गज नगरसेवक साथीला असताना ऋण काढून सण साजरे करण्याचे स्वप्न नवी मुंबईकरांना दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून निराशा पदरी पडल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
- ‘खोदा पहाड निकला चुहा’
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अंदाजपत्रक बनवणार असल्याने याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामळे सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ‘खोदा पहाड निकला चुहा’ असा प्रकार झाल्याचे अंदाजपत्रका- मधील आकड्यांवरुनदिसते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai