मिनी सी शोअर चौपाटीची विशेष स्वच्छता
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2026
- 29
नवी मुंबई ः पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार वाशी सेक्टर 10 येथील मिनी सी शोअर अर्थात जुहूगाव चौपाटी परिसर आणि प्राधान्याने तेथील धारण तलावाचा भाग याठिकाणी विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 40 हून अधिक स्वच्छताकर्मींनी यामध्ये सहभागी होत परिसराची सखोल स्वच्छता केली.
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी विशेष बैठक घेत घनकचरा व्यवस्थापन विभागासह पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, स्थापत्य, उद्यान अशा सर्वच विभागांना दृश्यात्मक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात कामाला सुरूवात झालेली असून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली वाशी सेक्टर 10 येथील मिनी सी शोअर अर्थात जुहूगाव चौपाटी परिसर आणि प्राधान्याने तेथील धारण तलावाचा भाग याठिकाणी विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी या धारण तलाव भागात मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सदर पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तत्पर पावले उचलण्यात आलेली आहेत. त्यास अनुसरून याठिकाणी प्राधान्याने सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर साहेब या मोहीमेप्रसंगी उपस्थित होते. 40 हून अधिक स्वच्छताकर्मींनी वाशी विभागाच्या स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ व स्वच्छता निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेमध्ये धारण तलावातील भागाची व परिसराची सखोल स्वच्छता केली. याप्रसंगी पर्यावरणप्रेमी नागरिकही उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai