आपत्ती व्यवस्थापनाविषयक प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2026
- 35
नवी मुंबई ः महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात ‘परिचय सराव आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी कोणतेही प्रशिक्षण हे स्वत:ला कृतीशील व अद्ययावत ठेवण्यासाठी महत्वाचे असते असे सांगत सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत गांभिर्यपूर्वक प्रशिक्षणातील गोष्टी शिकून घ्याव्यात अस सांगितले. या प्रशिक्षणाप्रसंगी एनडीआरएफचे मुख्य निरीक्षक श्री सुरेंद्र पुनिया, एसडीआरएफचे वरिष्ठ निरीक्षक सतीश सिंग, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे तहसील येथील मंडल अधिकारी मोहन बोंबे, नवी मुंबई अग्निशमन दलाचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदेश चन्ने व नागरी संरक्षण दलाचे विभागीय वॉर्डन अरुण सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये नमुंमपा मधील अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, नागरी संरक्षण दल, सफाई मित्र व ठाणे तहसील येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
प्रत्यक्ष प्रशिक्षणात एनडीआरएफमार्फत आपत्ती विषयक माहिती देऊन आपत्तीपूर्व व आपत्तीमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सीपीआर, बँडेजेस तसेच प्राथमिक स्वरूपात आपत्तीला सामोरे जाण्यासाठी लागणारे प्रशिक्षण याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती देऊन प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिके करून घेतली. सदर प्रशिक्षणामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai