ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे यांना ‘रायझिंग स्टार’ राज्यस्तरीय पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2026
- 29
नवी मुंबई : नवी मुंबईत तब्बल 29 वर्षे अखंडपणे बालनाट्य चळवळ उभी करून तिचा सातत्याने विकास करणारे ज्येष्ठ रंगकर्मी व सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांना राज्यस्तरीय ‘रायझिंग स्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रविवार, दि. 5 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर येथील ऐतिहासिक करवीर नगरीत, ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. स्वराज्य युवा प्रतिष्ठान व ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा. समीर काळे यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पवळे यांना गौरविण्यात आले. बालरंगभूमीच्या क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने कार्य करत असताना, श्रीहरी पवळे यांनी नव्या पिढीतील बालकलाकारांना घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बालकलाकारांनी नाट्यकलेत आपली ओळख निर्माण केली असून, नवी मुंबईत बालनाट्याची मजबूत परंपरा रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 50 कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पवळे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, नवी मुंबईतील विविध नाट्यसंस्था, बालकलाकार आणि त्यांच्या पालकांनी श्रीहरी पवळे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai