166 कोविड योध्दांना नोकरीत कायम करा
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 25
कर्मचाऱ्यांची आ. गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
नवी मुंबई : कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबईकरांसाठी मदतीचा हात देणाऱ्या कोविड कर्मचाऱ्यांना (करारपध्दीवर) आता स्वतःच्या हक्कासाठी लढावे लागत आहे. 2020 पासून महापालिकेत कार्यरत असलेल्या या 166 कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. कोविड योध्दांची नोकरीत कायम करण्याचे साकडे त्यांनी नाईक यांना घातले आहे.
2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करुन वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, औषध निर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांवर कर्मचाऱ्यांची करारपध्दतीवर भरती केली होती. कोरोना काळ संपल्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना सहा-सहा महिन्यांकरिता (180 दिवसांची ) मुदतवाढ आदेश देऊन आजही सेवेत कायम ठेवले आहे. मात्र, सध्या त्यांना मिळणाऱ्या वेतनात कपात करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक, एनयूएचएम मधील 10 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी आणि इतर 29 कर्मचाऱयांबाबत महापालिकेने आणि शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना कायमस्वरुपी करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले असताना, आम्हालाच डावलले जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र, कोविड काळात विहित मार्गाने (जाहिरात, मुलाखत, गुणवत्ता यादी) नियुक्त झालेल्या या 166 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव अद्यापही शासनाकडे पाठवण्यात आला नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या निदर्शनास आणुन दिले आहे. सदर कर्मचाऱ्यांनी या बाबतचे निवेदन महापौर सुजाता पाटील व आयुक्तांनाही पाठविले आहेत.
- कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
जाहिरात आणि गुणवत्ता यादीनुसार नेमणूक झाल्यामुळे शासनाने आम्हाला कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करावा. महासभेच्या ठरावानुसार करार कर्मचऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी आम्हालाही मिळावी. प्रशासन विभागाकडून अधिकृत ओळखपत्र आणि दरमहा पगार पावती मिळावी. नियुक्ती आदेश आणि ओळखपत्राअभावी कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai