नवी मुंबई विमानतळाची जागतिक पातळीवर छाप
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 25
तिहेरी सन्मान; वाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ; 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन
नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबर 2025 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. तेव्हापासून या विमानतळाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या विमानतळावरून दिवसाला सुमारे पाच हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र आता विमानतळावरून दररोज 160 विमानांचे लॅण्डिंग आणि टेकऑफ होत आहे. विमानतळाचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या थेट 22 हजारांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाने ‘अळीेीीिं एुेि 360 ड्ढ 2026’ मध्ये तीन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावत जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे. मे अखेरपर्यंत येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाने ‘अळीेीीिं एुेि 360 ड्ढ 2026’ मध्ये तीन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावत जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे. एाशीसळपस अळीेीीिं ेष ींहश धशरी 2026फ, मर्जीीीींंरपवळपस ढशीाळपरश्र ढशलहपेश्रेसू अुरीव 2026 ’ आणि ‘ झरीींपशीीहळि एुलशश्रश्रशपलश अुरीव ’ या सन्मानांमुळे या प्रकल्पाच्या उत्कृष्ट नियोजन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानभरारीबरोबर आता मे महिन्यापासून परदेशभरारीही घेता येणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्वाखाली साकारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नवी मुंबईला जागतिक विमानवाहतूक नकाशावर ठळक स्थान देत आहे. अत्याधुनिक डिजिटल प्रणाली, स्मार्ट सुविधा आणि शाश्वत विकासाच्या तत्त्वांवर आधारित उभारणीमुळे हे विमानतळ भविष्योन्मुख पायाभूत विकासाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, देशातील विमानतळ विकासासाठी नवे मानदंड प्रस्थापित करत आहे. ही कामगिरी सिडकोच्या सक्षम नियोजनशक्तीचे आणि परिणामकारक नेतृत्वाचे द्योतक असून, नवी मुंबईला ‘भविष्यकालीन जागतिक शहर’ म्हणून घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
- मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देशांतर्गत विमानसेवांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेचीही भरारी घेण्यासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. वास्तविक पाहता या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा 29 मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र अमेरिका आणि इराण युद्धामुळे हे वेळापत्रक पुढे ढकलावे लागले आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मे 2026 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली. युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज घेऊन 15 मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दररोज सुमारे 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्योन्मुख विस्तार: दुसऱ्या धावपट्टीचे काम सुरू असतानाच, प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सिडकोने तिसऱ्या धावपट्टीच्या नियोजन प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. तिसऱ्या धावपट्टीमुळे विमानतळाची अंतिम वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता 13 कोटी 50 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये दररोज सुमारे 5,000 प्रवाशांची हाताळणी करणारे एनएमआयए आता दररोज 22,000 हून अधिक प्रवासी आणि सुमारे 160 विमान हालचाली हाताळत आहे.
- प्रवासी व विमान वाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दररोज सुमारे 18,000 प्रवाशांची ये-जा होत असून, 156 विमानांच्या उड्डाणांची नियमित नोंद होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. आगामी काळात या विमानतळावरील प्रवासी आणि विमान वाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित असून, 2026 अखेरपर्यंत दररोज सुमारे 50,000 प्रवासी आणि 380 विमान हालचालींचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या विमानतळावरून जामनगर, देहरादून, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी देशांतर्गत विमानसेवा सुरू असून, कनेक्टिव्हिटी सातत्याने विस्तारत आहे. ही प्रगती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाढत्या क्षमतेचे आणि भविष्योन्मुख नियोजनाचे द्योतक आहे.
प्रवाशांकडून मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेऊन सिडकोने तिसऱ्या धावपट्टीच्या नियोजनास प्रारंभ केला आहे. ही धावपट्टी तयार झाल्यानंतर विमानतळाची क्षमता वर्षाला 13 कोटी 50 लाख प्रवासी हाताळण्याची होणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी विमानतळाचा वापर करणार आहेत. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर एनएमआयए जागतिक दर्जाचे विमान वाहतूक केंद्र म्हणून उदयास येईल. - विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai