स्थायी समिती सभेत विविध कामांना मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 42
नवी मुंबई ः महापालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विविध नागरी प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली.
यामध्ये शिरवणे यथील दत्तकृपा वाडी या ठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांना होणार त्रास दूर करण्यासाठी रु. 28 लक्ष 85 हजार रक्कमेच्या रस्ते सुधारणा कामास मंजूरी देण्यात आली. त्याचप्रमाणे वाशी विभागात से.11 जुहूगाव येथील रु. 71 लक्ष 87 हजार रक्कमेच्या गटारे व पदपथ सुधारणा कामास आणि वाशी मुख्य रस्त्यालगत हायवे जवळील से.1 डी टाईप बिल्डींग पासून ते से.2 आरती सोसायटी पर्यंत गटर व पदपथ सुधारणा करण्याच्या रु.2 कोटी 90 लक्ष इतक्या रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. अशाचप्रकारे से.11 जुहूगाव येथे रु.27 लक्ष 98 हजार रक्कमेच्या गटारे सुधारणा कामास तसेच बेलापूर विभागातील नेरुळ से.21 शंकराचार्य उद्यानासमोरील गटर व पदपथ सुधारणा कामाची साधारणत: रु. 61 लक्ष 32 हजार रक्कम मंजूर करण्यात आली. याशिवाय नेरुळ से.20 येथे शिवम अपार्टमेंट ते श्री विला पर्यंतच्या गटर सुधारणेच्या रु.35 लक्ष 50 हजार रक्कमेच्या कामाला मंजूरी मिळाली. नेरुळ से.18 येथील श्री गणेश तलावाच्या भोवती असणाऱ्या कुंपण भिंतीचे सुधारणा काम साधारणत: रु. 36 लक्ष 72 हजार खर्च करुन करण्यास तसेच आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2024-25 या निधीतून पिंपरी गाव येथे केदारेश्वर महाकाली परिसरात स्थानिक नागरिकांच्या समारंभासाठी राजेश मोरे यांच्या आमदार निधीतून सभामंडप बांधणे कामासाठी रु. 40 लक्ष 40 हजार खर्चास मान्यता मिळाली.
वाशी येथील पामबीच रोड कोपरी सिग्नल ते पामबीच गॅलेरिआ मॉल तसेच के स्टार हॉटेल ते अरेंजा कॉर्नरपर्यंतच्या रस्ता दुभाजकांमध्ये एफआरपी ग्रील बसविण्याच्या रु. 1 कोटी 17 लक्ष रक्कमेच्या कामास मंजूरी प्राप्त झाली. करावे गाव येथील जुने शौचालय तोडून एक मजली नवीन सामुदायिक शौचालय बांधण्याच्या रु. 58 लक्ष 65 हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली. नेरुळ से.16 ए येथील नमुंमपा शाळा क्रमांक 9 च्या इमारतीची संपूर्ण दुरुस्ती व सुधारणा करण्याच्या रु.61 लाख 77 हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. बेलापूर विभागात 9 पीबीआर ते से.58 ए नेरुळ येथील अमर सोसायटी समोरील ग्रीन बेल्ट मधील नाल्याच्या सुधारणा कामाच्या साधारणत: 1 कोटी 11 लक्ष रक्कमेस मंजूरी प्राप्त झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण संस्थेत सन 2024-25 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सन 2026-27 करिता भूलतज्ज्ञ, विकृती शास्त्र, सुक्ष्मजीव शास्त्र, विकिरण शास्त्र, सामुदायिक वैद्यकशास्त्र, नेत्र रोग, कान नाक व घसा संबधित एकूण 7 अभ्यासक्रमांकरिता प्रत्येक विषयाकरिता 30 विद्यार्थी अशी मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी विहित केलेल्या नियमावलीनुसार नमुंमपामध्ये किमान 2 वर्ष कार्यरत असलेल्या दोन विशेष तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी यांना वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून नियुक्ती देण्यास परवानगी देण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai