पावसाळ्यापूर्वी सर्वंकष तयारीला वेग
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 30
पनवेल महापालिकेची विविध विभागांसोबत बैठक
पनवेल ः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी पनवेल महापालिकेकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित नियोजन बैठक आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी विविध विभागांना तत्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांमध्ये समन्वय राखून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पूरस्थिती उद्भवल्यास गाढी नदी परिसरातील नागरिकांसाठी तात्पुरते निवारा (ट्रान्झिट कॅम्प) उभारण्याची तयारी करणे व त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच शहरातील सर्व नाले वेळेत साफ करण्याच्या सूचना संबधित विभागाला देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची आढावा घेऊन तेथे त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. फायर ब्रिगेड यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच,धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्यादृष्टीने सिडको,एमएसीबी यांनी सहकार्य करण्याच्या सूचना या बैठकित देण्यात आल्या. तसेच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्याची माहिती पोलिस विभागाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, पोलिस उपायुक्त तिरूपती काकडे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी , उपअभियंता विलास चव्हाण, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी ,वृक्ष प्राधिकरण विभाग प्रमुख संदिप पवार, पोलिस विभागाचे चारही प्रभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस, पालिका अधिकारी, सिडको अधिकारी, आयआरबी प्रतिनिधी, उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai