एनएमएमटीच्या ताफ्यात 400 नव्या बसेस येणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 26
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला बळकटी देण्यासाठी एनएमएमटीच्या ताफ्यात तब्बल 285 नव्या बसेस दाखल करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत नव्या बसेस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. तसेच यापुर्वी मंजुर झालेल्या 100 बसेसही लवकरच परिवहनच्या ताफ्यात येणार आहेत. नागरिकांना अधिक दर्जेदार, नियमित आणि प्रवासी-केंद्रित सेवा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, एनएमएमटीच्या मालकीच्या बसेसची संख्या अत्यंत कमी झाली होती. डिझेल बसेस टप्प्याटप्प्याने बाद करण्यात आल्याने अनेक मार्गांवर बससेवेचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर 100 सीएनजी बसेस आणि 25 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘ग्रॉस कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट’ (जीसीसी) मॉडेलवर सुमारे 150 बसेस भाडे तत्त्वावर चालवण्यात येणार आहेत. यामुळे एकूण 285 नव्या बसेस एनएमएमटीच्या सेवेत दाखल होतील.
यापूर्वी मंजूर झालेल्या सुमारे 100 बसेसही पुढील दोन ते तीन महिन्यांत उपलब्ध होणार असल्याने एनएमएमटीच्या ताफ्यात एकूण जवळपास 400 नव्या बसेसची भर पडणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसर, उलवे, ऐरोली, ठाणे-बेलापूर मार्ग तसेच शीव-पनवेल महामार्गावरील प्रवासी संख्या लक्षात घेऊन नवीन मार्ग आणि वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांची संख्या कमी असलेल्या मार्गांचे पुनरावलोकन करून वेळापत्रक आणि मार्गरचना सुधारण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहेत. डेपो व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सेवा अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे झंजाड यांनी सांगितले.
- दहा डबल डेकर बस
वाशी ते ठाणे, ऐरोली तसेच उलवे मार्गांवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 10 डबल डेकर बसेस सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन सेवेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जाहिराती, मोबाइल टॉवर आणि इतर उत्पन्नवाढीच्या पर्यायांचाही विचार सुरू असल्याचे परिवहन समितीकडून स्पष्ट करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai