नवी मुंबईत इंटरनॅशनल मेडीसिटी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 20
नवी मुंबई ः नवी मुंबईत 250 एकर जागेवर साकार होणाऱ्या ‘नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने बुधवारी क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफील्ड असेट मॅनेजमेंट आणि अवरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत सामंजस्य सामंजस्य करार केला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, किनारी मार्ग, मेट्रो नेटवर्क या ठिकाणी उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आता जागतिक दर्जाचा आरोग्य प्रकल्प ‘नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी’ उभारण्यात येत आहे. सुमारे 250 एकर परिसरात पसरलेल्या प्रस्तावित एनएमआयएमसीमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि नर्सिंग शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, एआय-आधारित आरोग्यसेवा आणि वेलनेस पायाभूत सुविधा व संबंधित सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये समाविष्ट असतील, असे राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. क्लीव्हलँड येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामंजस्य करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनएमआयएमसी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हील इन इंडिया उपक्रमाशी संलग्न असेल आणि तो लवकरच प्रत्यक्षात येईल. ‘आजचा सामंजस्य करार हा भारतातील आरोग्यसेवेच्या एका परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. आम्हाला अभिमान आहे की, जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने या उपक्रमात महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्याचे निवडले आहे,’ असे फडणवीस म्हणाले. या करार सोहळ्यात क्लिव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहालजेविक, हृदयविकार विभागाचे अध्यक्ष डॉ. समीर कापाडिया, उद्योगपती लक्ष्मी मित्तल तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धावसे यांनी राज्याच्या क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयाचे प्रतिनिधित्व केले. सामंजस्य करारानुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पासाठी प्रमुख संस्था म्हणून काम करेल. यामुळे प्रगत आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि रुग्ण-केंद्रित काळजी या क्षेत्रांतील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे अंदाजे 1.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. या मेडीसिटीमध्ये अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था, जैवतंत्रज्ञान केंद्रे, जीनोमिक्स प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्यसेवा सुविधा आणि नवोन्मेष केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. देशातील तसेच जगभरातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा भारतात उपलब्ध करून देणे, वैद्यकीय पर्यटनाला चालना देणे आणि अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 10 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून वैद्यकीय, संशोधन, तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
क्लीव्हलँड क्लिनिकचे सीईओ आणि अध्यक्ष, डॉ. टॉम मिहाल्जेविक म्हणाले, “क्लीव्हलँड क्लिनिक जगभरातील धोरणात्मक भागीदारींच्या माध्यमातून रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांना पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएमआयएमसी हे रुग्ण, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि संशोधक यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या एका दूरदर्शी आरोग्यसेवा परिसंस्थेमध्ये आमचे कौशल्य योगदान देण्याची संधी प्रदान करते. भारतात वैद्यकीय उत्कृष्टता, नावीन्य आणि शिक्षणासाठी एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभारण्याकरिता महाराष्ट्र सरकार, ब्रुकफील्ड आणि अवरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे.”
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai