न्हावे गावात भीषण पाणीटंचाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 27
15 दिवसांनी अवघ्या 30 मिनिटांचा पाणीपुरवठा
उरण ः पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत तब्बल 14 ते 15 दिवसांनी केवळ 30 मिनिटांसाठी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामसुधारक मंडळ न्हावे माजी अध्यक्ष योगेश पाटील यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे हाल होत आहेत. गावातील मुख्य जलवाहिनीवरून काही व्यक्तींनी अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी सुरू ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकारामुळे अधिकृत ग्राहकांना मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योगेश पाटील यांनी सांगितले की, गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सिडको प्रशासन, संबंधित शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सध्याची परिस्थिती पाहता गावात तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी पुढे आली आहे. तसेच प्रशासनाने तातडीने पाणीचोरी रोखून टँकरची व्यवस्था करावी व दीर्घकालीन उपाययोजना जाहीर कराव्यात. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशारा ग्रामसुधारक मंडळ न्हावे माजी अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai