348 औषधे दान करून तोगरे दाम्पत्याचा समाजोपयोगी उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 28
उरण ः रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, जीते येथे उरण मधील जेष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे तथा समाजसेविका सुमनताई संग्राम तोगरे महाराष्ट्र शासन पुरस्कारित यांच्या वतीने 348 प्रकारची औषधे दान करण्यात आली. या औषधांची अंदाजे किंमत सुमारे एक ते सव्वा लाख रुपये किमतीची आहेत.ग्रामीण भागातील रुग्णांना आवश्यक औषधे सहज उपलब्ध व्हावीत तसेच आरोग्य सेवेला बळकटी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या औषधदानामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना मोठा लाभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा माळगे, औषध निर्माण अधिकारी श्रीमती रुपाली म्हात्रे, लॅब टेक्निशियन श्रीमती प्रियांका लोहार, आरोग्य निरीक्षक उदय म्हात्रे व राजेश म्हात्रे, आरोग्य सेवक भूषण पाटील, स्टाफ नर्स श्रीमती सुनीता गवळी, स्त्री परिचर श्रीमती ज्योत्स्ना दळवी तसेच सफाई कामगार श्रीमती प्रफुल्ला नाईक उपस्थित होते.
उपस्थितांनी जेष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे व जेष्ठ समाज सेविका सुमनताई संग्राम तोगरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत या उपक्रमाचे स्वागत केले.विशेष म्हणजे, तोगरे दांपत्याने आजपर्यंत महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांतील 168 शासकीय रुग्णालये तसेच अनेक नोंदणीकृत सामाजिक संस्थांना दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे दान केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे आरोग्य क्षेत्रात सामाजिक सेवेचा नवा आदर्श निर्माण झाला असून, त्यांनी केलेली ही सेवा अतुलनीय,उल्लेखनीय मानली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai