कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 27
निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; ऐरोली नाट्यगृहातील प्रकाराबाबत भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे नवी मुंबई प्रभारी सुनील पगार यांचे महापौरांना निवेदन
नवी मुंबई ः ऐरोलीतील प्रस्तावित नाट्यगृहाचे काम सध्या सुरु आहे. मात्र येथे कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. पालिकेचे कनिष्ठ अभियंता व सुरक्षा अधिकारी उपस्थित नसताना कोणत्याही सुरक्षेविना कामगारांकडून काम करुन घेतले जात असल्याचा आरोप करत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे नवी मुंबई प्रभारी सुनील पगार यांनी केली आहे.
ऐरोली नाट्यगृहाचे प्रवेशद्वारासमोर परांच्या उतरवण्याचे काम सुरू असून 50 फुटावर असलेल्या कामगारांना कोणत्याही प्रकारचे हर्णेस, सेफ्टी बेल्ट किंवा हेल्मेटची सुरक्षा नसल्याचे सुनील पगार यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नाट्यगृहामध्ये जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली असता नाट्यगृहाच्या आतील भागात काम करणारे कामगार कोणत्याही सुरक्षेविना काम करत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी संबंधित पालिकेचे अधिकारी, सेफ्टी ऑफिसर व कंत्राटदाराचे कोणतीही संबंधित व्यक्ती उपस्थित नव्हते. तसेच, सर्व कामगारांना ‘लेबर कॅम्प’ ची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हे कंत्राटदाराचे आहे. तरी, कामगार नाट्यगृहामध्ये राहत असल्याचे दिसून आले. सोबतच गॅसचा वापर कामगार त्या ठिकाणी सर्रास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वीच ऐरोली येथील प्रास्ताविक नाट्यगृहाला आग लागली होती. त्या अनुषंगाने हि बाब धोकादायक आहे असे मत अभिनेता सुनील पगार यांनी व्यक्त केले.
रविवारच्या दिवशी सुट्टी असताना संबंधित पालिकेचे कनिष्ठ अभियंता व सुरक्षा अधिकारी नसताना काम कोणत्याही सुरक्षते विना का सुरू ठेवले? एखादी जीवितहानी झाली किंवा एखादी घटना घडली तर, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी सुरक्षा अधिकारी घेणार का? असा देखील सवाल सुनील पगार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुनील पगार यांनी केली आहे. त्यांनी महापौर सुजाता पाटील यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai