लोकल ट्रेनमध्ये क्षुल्लक वादावरुन खून
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 24
मुंबई ः चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट-क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्याच्या किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपीला पोलीसांनी 24 चासाच्या आत पनवेल येथून ताब्यात घेतले. या घडलेल्या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मयंक रमेश लोहार हा विरारमधील रहिवासी असून अंधेरी येथील एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. मंगळवारी 23 जून काम आटोपून तो चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून घरी परतत होता. त्यावेळी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा उघडा असल्याने पावसाचे पाणी आणि वारा आत येत होता. त्यामुळे मयंकने एका सहप्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले. मात्र, याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वाद इतका वाढला की आरोपीने रागाच्या भरात धारदार चाकू काढून मयंक लोहारच्या पोटात वार केले. यात मयंक हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेला सतर्क करण्यात आले. लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील मयंकला डब्ब्यातून बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी रेल्वेच्या वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर बोरीवली स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच आरोपी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळ चालत्या ट्रेनमधून उडी मारून फरार झाला. याप्रकरणी बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, आरोपी रोशन सुवर्णा हा त्याच्या मूळगावी, कर्नाटकातील मंगळुरूला पळून जायच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने बसच्या तिकिटाचे बुकिंगही केलं होतं. पनवेलमधून तो जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाळे लावले. रोशन सुवर्णा त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai