10442 महिलांनी घेतला शिबीराचा लाभ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 17
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा अंतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक गुरुवारी विशेष हिवताप, डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
दि. 04/06/2026 ते दिनांक 25/6/2026 या कालावधीत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 104 ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरिता 36300 नागरिकांनी भेट दिली असून, 1718 रक्तनमुने घेण्यात आले. यामध्ये दि. 25/6/2026 रोजी आरोग्य परिरक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ व संपुर्ण आरोग्य समिती पथकाने सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे आयोजीत शिबीराच्या ठिकाणी भेट दिली. त्याचप्रमाणे सोमवार दि. 29/06/2026 रोजी वटपोर्णिमेचे औचित्य साधुन महिलांमध्ये विशेष जनजाग्रुती करणेकरीता नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती करण्यात आली असुन एकुण 25 शिबीरांचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकुण 10442 महिलांनी/नागरीकांनी लाभ घेतला असून, एकुण 153 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.
सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून उपाययोजना व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, घर व परिसर स्वच्छता ठेवणे, पाणी उकळुन पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवुन वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai