महिलांमधील स्थूलता चिंताजनक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2026
- 26
महाराष्ट्रात अतिरिक्त वजन आणि स्थूलतेची समस्या वेगाने वाढत असल्याचे ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6’ च्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात आता सुमारे 31.1 टक्के महिला अतिरिक्त वजनाच्या किंवा स्थूलतेच्या श्रेणीत येतात. ही आकडेवारी मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये हे प्रमाण 23.5 टक्के होते. म्हणजेच काही वर्षांमध्येच या समस्येत सुमारे 32 टक्के वाढ झाली आहे.
शहरी महाराष्ट्रात परिस्थिती अधिक गंभीर आहे. शहरांमध्ये 40.1 टक्के महिलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक 25 किंवा त्याहून अधिक आहे. भारतीय मानकांनुसार तो अतिरिक्त वजन आणि स्थूलता दर्शवतो. म्हणजेच शहरांमध्ये प्रत्येक दहापैकी चार महिला या समस्येने ग्रासल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, स्थूलता आता दोनशेहून अधिक आजारांचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यात काही प्रकारचे हृदयरोग, मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगांचाही समावेश आहे. तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रात हे प्रमाण कमी असून सुमारे 24.8 टक्के महिलांमध्ये अतिरिक्त वजन किंवा स्थूलतेची समस्या दिसते. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्पष्ट तफावत दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील महिलांमधील स्थूलतेचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 27 टक्क्यांपेक्षा अधिक असले, तरी दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत कमी आहे. तज्ज्ञाच्यां मते आहारात बदल, कमी शारीरिक हालचाल आणि बैठी जीवनशैली ही या वाढत्या समस्येची प्रमुख कारणे आहेत. मोटार वाहनांवर वाढते अवलंबित्व आणि चालणे-फिरणे कमी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. पुरुषांमध्येही ही समस्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात 32.8 टक्के पुरुष अतिरिक्त वजनाचे कवा स्थूल आहेत, तर महिलांचे प्रमाण 31.1 टक्के आहे.
ही महत्त्वाची कारणे
आहारातील कर्बोदके आणि मेदाचे जास्त प्रमाण तसेच प्रथिनांची कमतरता ही स्थूलतेच्या वाढीमागील महत्त्वाची कारणे आहेत. बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि बसून राहण्याचे वाढते प्रमाण यामुळे वजनवाढीची समस्या अधिक तीव्र झाली. महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते, तसेच गर्भधारणेनंतर वजन वाढण्याचाही परिणाम दिसून येतो.
डॉ. शीला बोऱ्हाडे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai