अर्णब गोस्वामी यांना अटक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 04, 2020
- 844
इंटिरियर डिझायनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मुंबई : ‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. 53 वर्षीय इंटिरियर डिझायनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अर्णब यांना ही अटक झाली आहे. आता मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध आणखी एक एफआयआर दाखल केली आहे.
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
एका पोलिस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरातून अटक केली. यावेळी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. मात्र अर्णब यांनीच महिला पोलीस अधिकार्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पोलीस पथक जेव्हा अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी अर्णब गोस्वामी यांनी महिला पोलिस अधिकार्याशी गैरवर्तन केले.
आणखी दोघांना अटक
रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज शेख, नितेश सारडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरजा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते.
काय आहे हे प्रकरण?
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचे काम केले होते. स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी 5 कोटी 40 लाख इतके बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणे होते. पण, वारंवार बिल मागूनही गोस्वामींकडून बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब तसेच फिरोज शेख, नितेश सारडा यांना जबाबदार धरले होते. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai