स्तन कर्करोग तपासणी शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 14, 2026
- 32
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कामोठे, नवी मुंबई येथे स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्याचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.
या शिबिरामध्ये परिसरातील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिबिरादरम्यान महिलांची स्तन तपासणी करण्यात आली तसेच आरोग्याविषयी मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये स्तनाचे स्व-तपासणी कशी करावी, नियमित तपासणी का आवश्यक आहे आणि महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक कसे राहावे याबद्दल माहिती देण्यात आली. स्तन तपासणी ही स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जगभरात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आहे.नियमित तपासणी आणि जागरूकतेमुळे या आजाराचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊ शकते, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते. स्तनामध्ये गाठ जाणवणे, त्वचेतील बदल, आकारात फरक दिसणे अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनी ताजणे यांनी केले. त्यांनी स्त्री शक्ती सामाजिक संस्था यांच्या अध्यक्षा गीता कुडाळकर, उपाध्यक्षा अलका चौधरी, सचिव शमिका जाधव, खजिनदार कु. वैदेही कुडाळकर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. या शिबिरामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यास मोठी मदत झाली, तसेच भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. रजनी ताजणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. तसेच भविष्यातही अशा सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. उपस्थित महिलांनी आणि आयोजकांनी एकत्र येऊन महिला सशक्तीकरण, आरोग्य जागरूकता आणि समाजातील एकतेचा संदेश दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai