भाज्यांच्या दरात घसरण
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2020
- 880
नवी मुंबई ः थंडीमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असल्याने भाज्यांची आवक वाढून भाव कमी होतात. मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण सुरूच आहे. भाजीपाला घाऊक बाजारात 15 दिवसांपासून सातत्याने आवक वाढली. 500 ते 700 गाड्याची आवक असून, ग्राहक नसल्याने भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 600 गाड्यांची आवक झाली.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांचे दर वाढले होते. मात्र आता बाजारात भाज्यांचे भाव कोसळले असून, 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आज 5 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर फ्लॉवर 8 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. 200 रुपये विकला जाणार्या वाटाणा 15 ते 20 रुपये किलोने विकला जातोय. मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये ग्राहक कमी असल्याने मालाला उठाव नाही. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली. सध्या बाजारात भेंडी 25 ते 30 रुपये, कोबी 4 रुपये, फ्लॉवर 8 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तर आज नेमका भाज्यांचा बाजारभाव काय आहे ते जाणून घेऊया. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 600 गाड्यांची आवक झाली असून, भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे.
एपीएमसीमधील भाज्यांचे दर
वाटाणा 15 ते 20
दुधी 10 ते 14
बांगी 12 ते 15
भेंडी 30 रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर 5 ते 8 रुपये जुडी
मिरची 30 ते 35 रुपये प्रतिकिलो
कोबी 4 रुपये प्रतिकिलो
फ्लॉवर 8 रुपये प्रतिकिलो
टोमॅटो 12 ते 14 रुपये प्रतिकिलो
काकडी 10 ते 15
गाजर 20 रुपये
शिमला 25 रुपये
फरसबी 30 ते 40
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai