नवी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र परिषद 2026’
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 23
2,500 हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत दिग्गजांचे होणार मंथन
नवी मुंबई : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, दिनाचे औचित्य साधून येत्या दि. 27 जून 2026 रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ‘महाराष्ट्र परिषद व पुरस्कार 2026’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.00 ते सायंकाळ 5.30 या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी “संकल्पातून सिद्धीकडे” ही संकल्पना (थिम) निश्चित करण्यात आली आहे. एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेमध्ये राज्यभरातील 2 हजार 500 हून अधिक उद्योजक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान उद्योग जगताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल परिवर्तन, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा तसेच महिला उद्योजकतेला चालना देणे यांसारख्या विषयांवर विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र पुरस्कार 2026 चे वितरण केले जाणार आहे. राज्यातील उत्कृष्ट उद्योजकता, नवीन उपक्रम आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार नऊ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रदान केले जातील. यामध्ये आर्टिसन/हँडिक्राफ्ट पुरस्कार, नेक्स्टजेन पुरस्कार, डिजिटल आणि एआय एक्सलन्स पुरस्कार, सर्व्हिस पुरस्कार, मॅन्युफॅक्चरिंग पुरस्कार, ग्रीन एंटरप्राइझ पुरस्कार, वुमन एंटरप्रेन्योर पुरस्कार आणि एक्सपोर्ट पुरस्कार यांचा समावेश आहे. तसेच चॅम्पियन पुरस्कार ही यातील एक विशेष श्रेणी असेल. चॅम्पियन श्रेणी वगळता इतर प्रत्येक श्रेणीत एक्सलन्स आणि अचीव्हर्स अशा दोन उपश्रेणींमध्ये विजेत्यांची निवड करून राज्यातील नावीन्यपूर्ण, प्रगत आणि तंत्रज्ञानाभिमुख उद्योगांचा सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व उद्योजकांना या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai