सिडकोतर्फे 106 निवासी भूखंड विक्रीकरिता
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2021
- 531
नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 इतक्या मोठ्या प्रमाणावर निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर भूखंड हे बंगलो, रो-हाउस आणि निवासी इमारतींकरिता उपलब्ध आहेत. यामुळे नवी मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे बंगला, रो-हाउस बांधू इच्छिणारे नागरिक आणि विकासक, बांधकाम व्यावसायिक यांच्याकरिता सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 10 फेब्रुवारी 2021 पासून सुरुवात झाली आहे.
सदर योजने अंतर्गत नवीन पनवेलमधील 28, खारघर येथील 15, नेरूळ येथील 12, घणसोली येथील 38 आणि ऐरोली येथील 13, असे एकूण 106 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्व भूखंड हे केवळ निवासी वापराकरिता आहेत. या भूखंडांकरिता ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे अर्ज मागविण्यात आले असून अर्ज नोंदणी, निविदा सादर करणे, अनामत रक्कम व शुल्क भरणा इ. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. योजनेच्या अर्ज नोंदणीस 10 फेब्रुवारी 2021 पासून सुरुवात झाली आहे. ई-निविदा प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू होऊन 01 मार्च 2021 रोजी सायंकाळी 17.00 वाजता संपुष्टात येईल. ई-लिलाव प्रक्रिया 03 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू होऊन 03 मार्च 2021 रोजी सायंकाळी 17.00 वाजता संपुष्टात येईल. योजनेची सविस्तर माहिती आणि भूखंडांचा तपशील जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी हींींिी://शर्रीलींळेप.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेचे (स्कीम बुकलेट) अवलोकन करावे.
सदर योजने अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूखंड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे, नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात आपल्या मनासारखे घर बांधू इच्छिणार्या सर्वसामान्य नागरिकांकरिता आणि विकासकांकरिता मोठी संधी निर्माण झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यास मदत होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
या योजनेमुळे नवी मुंबईमध्ये बंगला, रो-हाउस, असे आपल्या मनासारखे घर बांधण्याची इच्छा असणार्या सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेमुळे शहरातील बांधकाम क्षेत्रालाही नवचैतन्य प्राप्त होणार आहे.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai