नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोकडून मंजूर
- by Aajchi Navi Mumbai
- May 04, 2021
- 455
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको संचालक मंडळाने मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. या निर्णयाविषयी प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे, यासाठी लढा उभारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त संघटनांनी दिला आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणार्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त संघटना अनेक वर्षांपासून करीत आहेत. यासाठी पाठपुरावा सुरू असताना 24 डिसेंबरला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र देऊन विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची सूचना केली होती. यानंतर सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नामकरणाचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याविषयी माहिती समजताच प्रकल्पग्रस्त संघटनांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. सर्व संघटना व सामाजिक, राजकीय नेत्यांना एकत्रित करून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai