हळदीत गोळीबार करणारे गजाआड
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2021
- 513
पनवेल ः पनवेलमधील धाकटा खांदा गावात हळदी समारंभाच्या कार्यक्रमात गोळीबार केल्याची घटना घडली होती. नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तसेच पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला होता. हा गोळीबार करणार्या तिघांना अटक करण्यात कामोठे पोलिसांना यश आले आहे.
हळदीच्या कार्यक्रमात चॉपरने फिर्यादी यांना धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली होती. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गोळीबार करणारे पसार झाल्याने त्यांचा शोध सुरु होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील, यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे वेगवेगळे तपास पथक नेमले होते. तपास पथकाने घटनास्थळ ते मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, गोवा रोड, उरण रोड व मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गावरील टोल नाक्याचे सीसीटीव्ही फुटेज तपास करून सदरचा परिसर पिंजून काढला. त्यानंतर काम करत असलेल्या ठिकाणी व जवळच्या मित्रांना विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली.
मोठ्या शिताफीने लोणावळा, पुणे परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेले हत्यार व गावठी बनावटीचे पिस्तूल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता हळदी समारंभाचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai