पनवेलमध्ये 15 मार्चला सारस्वतांचा मेळा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 24
पनवेल: पनवेल येथे सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन येत्या 15 मार्चला संपन्न होत असून राज्यभरातून सारस्वतांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता शुभारंभ होईल. कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेने आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. तर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुश्राव्य संगीत रजनीने सोहळ्याची सांगता होणार आहे. सर्व रसिक, प्रेषक, वाचक, साहित्यिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या शुभारंभापूर्वी प्रथेप्रमाणे पनवेल एसटी स्टॅण्ड समोरून साहित्य दिंडी काढण्यात येईल. तिचे आगमन नाट्यगृहात होईल. विविध कार्यक्रमांतून मराठी भाषेचा जागर घालण्यात येणार आहे. मराठी माणसाला जागा करण्यापासून ते राज्य आणि केंद्र सरकारला मराठीच्या जतनाकरिता गाऱ्हाणे घालण्यात येणार आहे. एवढ्यासाठीच हा घाट घातला असून महाराष्ट्रात मराठी बोलीभाषा, प्रमाणभाषा बोलली जावी, यासाठीच्या सक्तीचे संकेत देण्याकरिता कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य सांस्कृतिक परिषदेने खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. त्यातून हे चौथ्ये राज्यव्यापी साहित्य संमेलन साजरे केले जात आहे. त्याकरिता राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. कवी, गजलकार, धवलागीत, पोवाडे गाण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य दोन्ही संस्थांना पेलण्यास सहकार्य करणार आहेत.तेव्हा सर्वांनी मनमोकळे पणाने सहभागी व्हावे. दिवसभर वातानुकूलित नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी स्वादिष्ट आणि पोषक भोजनाचे मोफत आयोजन केले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
डॉ. दीपक पवार, हे नाव महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षितिजावर गेली अनेक वर्षे चमकत आहे. ते मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच मराठी अभ्यास केंद्राचेही ते अध्यक्ष आहेत. तेच या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai