निर्बंधातील शिथिलतेमध्ये नियमांचे काटेकोर पालन करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2021
- 374
आयुक्तांचे आवाहन ; संभाव्य तिसर्या लाटेतील पूर्वतयारीचा घेतला आढावा
नवी मुंबई ः नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली असल्याने वी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासन निर्देशानुसार स्तर 2 करिताचे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या निर्बंधांचे काटेकोर पालन होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच त्यांनी कोव्हीडच्या संभाव्य तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा विषयनिहाय आढावा घेतला.
‘ब्रेक द चेन’ करिता निर्बंधांचे 5 स्तर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका दुसर्या स्तरात आहे. त्याबाबतचे नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये आधीचे निर्बंध स्थानिक परिस्थितीनुसार शिथील करण्यात आले आहेत, त्यामुळे कोव्हीड प्रतिबंधासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही व मास्क, सुरक्षित अंतर अशा कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यादृष्टीने विभाग पातळीवरील दक्षता पथके तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथके यांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन होणार नाही याकरिता अधिक कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेशित करण्यात आले. संभाव्य तिसर्या लाटेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून त्याचा सुविधानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे तसेच औषध पुरवठा यांच्याही निविदा प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण कराव्यात असे आयुक्तांनी आदेशित केले.
दुसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासली होती हे लक्षात घेत महानगरपालिकेच्या वतीने 4 ठिकाणी पोर्टेबल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून या कामाला गती द्यावी व विहित कालावधीत काम पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. खाजगी रुग्णालयांनीही त्यांना आवश्यक असलेला ऑक्सिजनची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. प्रत्येक विभागात पुरेशा बेड्स क्षमतेची कोव्हीड केअर सेंटर असावीत यादृष्टीने नियोजन करून पुढील बैठकीत तपशील सादर करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या. कोव्हीडच्या तिसर्या लाटेत कोरोना बाधीतांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक असणार आहे अशी शक्यता वर्तविली जात असून त्यादृष्टीने पिडीयाट्रीक आयसीयू कक्षामधील वैद्यकीय उपचारांबाबतही विशेष प्रशिक्षण देण्याविषयी तत्परतेने कार्यवाही करावी असे सूचित करीत आयुक्तांनी या डॉक्टर, नर्सेस प्रशिक्षणातील समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा असेही निर्देश दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai