पोलीस भरतीची लेखी परीक्षा येत्या आठवड्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2021
- 550
मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 2019 मध्ये काढण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असुन पोलिस शिपाई चालक या पदाची लेखी परीक्षा येत्या 22 सप्टेंबर रोजी तर पोलिस शिपाई पदाची लेखी परिक्षा 24 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या लेखी परिक्षाचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना http://mahapolicerc.mahaitexam.in/ या वेबसाईटवर 16 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच लेखी परिक्षेच्या दिवशी ओळखपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या 61 पोलीस शिपाई व 103 पोलीस शिपाई चालक (गट-क) या पदाची भरती प्रक्रिया 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्याच कालावधीत कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र सध्या कोव्हीडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परिक्षा 22 सप्टेंबर तर पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा 24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 12. 30 या वेळेत घेण्यात येणार असल्याचे नवी मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर येणार्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन पोलीस भरती मंडळाचे अध्यक्ष तथा पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव यांनी केले आहे. उमेदवारांनी परिक्षेसाठी त्यांच्या सोबत स्वत : चे प्रवेशपत्र, फोटो असलेले ओळखपत्र व काळा/निळा बॉलपेन सोबत आणावे. या साहित्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तु सोबत आणु नयेत, या 3 वस्तुंव्यतिरिक्त मोबाईल फोन, पिशवी, डिजीटल घड्याळ आणु नयेत. अशा सूचना नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai