खरात प्रकरणात शासकीय अधिकारी ईडीच्या रडारवर?
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 19
पोलीस सीडीआर अहवालानुसार करणार चौकशी
नवी मुंबई ः राज्यातील बहुचर्चित खरात प्रकरणात ईडीने उडी घेतल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. खरातच्या मोबाईल फोनचा सीडीआर पोलीसांना उपलब्ध झाल्याने राज्यातील महत्वाच्या पदांवरील कोणते अधिकारी खरात याच्या संपर्कात होते याचा खुलासा होत आहे. सदर प्रकरण महिलांच्या लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता शेकडो कोटींच्या उलाढालीचा तपशील हाती आल्याने ईडी या प्रकरणाचा तपास करणार असल्याने अनेक अधिकारी ईडीच्या रडावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भोंदुबाबा अशोक खरात याचे नवनवीन कारनामे पोलीस तपासात उघडकीस येत आहेत. त्यात पोलीसांना खरातच्या मोबाईलचा सीडीआर मिळाल्याने राज्यातील अनेक राजकर्ते व शासकीय अधिकारी त्याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. खरात याने स्थापन केलेल्या अनेक संस्थांवर काही शासकीय अधिकारी सदस्य असल्याचे बोलले जात आहे. या संस्थांच्या माध्यमातून बेनामी मालमत्ता खरेदी करणे तसेच अधिकाऱ्यांनी कमावलेले काळे धन गोरे करण्याचा गोरखधंदा केला असल्याचा संशय पोलीसांना आहे. या संस्थांमार्फत शेकडो कोटींचा व्यवहार झाल्याची शंका पोलीसांना आल्याने सदर प्रकरण आता प्रवर्तन निर्देशनालय हाताळणार आहे. ईडीच्या एन्ट्रीने शासकीय अधिकारी व राजकर्त्यांचे धाबे दणाणले असून यातून सूटण्यासाठी सर्वजण आपल्या राजकीय गॉडफादरचे उंबरठे झिजवत आहेत.
सदर भोंदुबाबा अशोक खरात याने नवी मुंबई महापालिकेला तीनवेळा भेट दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेचे कोणते अधिकारी खरात याच्या संपर्कात होते हे पोलीसांना सीडीआरमार्फत कळेल आणि त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खरातच्या संस्थेत त्यांची वरकमाई गुंतवली तर नाही ना याचा तपास प्रवर्तन निर्देशनालयामार्फत होण्याच्या शक्यतेने संबंधित अधिकाऱ्यांच्या फेऱ्या नंदनवनावर वाढल्या असल्याची जोरदार चर्चा पालिकेत आहे. दरम्यान, भोंदुबाबा अशोक खरात अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुलांना आयएएस बनवण्याचे आश्वासन तसेच काळे धन गोरे करण्याची सेवा त्यांच्या भक्तांना देत असल्याने या सेवेचा कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांनी लाभ घेतला याचा आढावा पोलीस व ईडी तपासात घेणार असल्याने सर्वांचेच धाबे दणाणलेआहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai