3 बारकडून वसूल केला प्रत्येकी 50 हजार दंड
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2021
- 503
नवी मुंबई ः शासनाच्या नियमावलीस अनुसरून रात्री 10 वाजेपर्यंत रेस्टॉरंट खुले ठेवण्यास परवानगी असून त्यानंतरही रेस्टॉरंट खुले ठेवणार्या 3 रेस्टॉरंट कम् बारवर धडक कारवाई करीत पालिकेच्या विशेष दक्षता पथकांनी प्रत्येकी 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
सेक्टर 19 डी येथील लिव्ह इट अप रेस्टॉरंट बारमध्ये रात्री 11 वा. नंतरही ग्राहक असल्याने त्यावर कारवाई करीत 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. अशाच प्रकारे सेक्टर 5 कोपरखैरणे येथील मयुर रेस्टॉरंट अँड बार त्याचप्रमाणे सेक्टर 11, सीबीडी बेलापूर येथील बिग बॉस बारवर धडक कारवाई करीत त्यांच्याकडूनही 50 हजार रक्कमेचा दंड विशेष दक्षता पथकांकडून वसूल करण्यात आलेला आहे. गणेशोत्सव कालावधीत या विशेष दक्षता पथकांनी 404 नागरिक, आस्थापना यांच्यावर कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करीत 2 लक्ष 72 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दुकाने,आस्थापना 10 वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल तसेच रेस्टॉरंट,बार, पब 10 वाजल्यानंतर सुरु असल्यास रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येते. त्याचप्रमाणे या नियमांचे दुसर्या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येत व तिसर्या वेळेस नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यास सदर आस्थापना कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असे आदेशात स्पष्टपणे नमूद आहे. याकरिता पालिकेच्या वतीने विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत दक्षता पथकांप्रमाणेच मुख्यालय स्तरावरून गठीत करण्यात आलेल्या विशेष दक्षता पथकांकडूनही लक्ष ठेवण्यात येत आहे. 10 ऑगस्ट 2020 पासून या दक्षता पथकांनी 74,286 नागरिक, आस्थापना यांचेकडून कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने रू. 3 कोटी 91 लक्ष 07 हजार 100 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai