23 सप्टेंबर पासून मिळणार एनएमएमटीचा पास
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 22, 2021
- 502
नवी मुंबई ः कोरोनाकाळात देशात टाळेबंद असल्याने 25 मार्च 2020 पासून सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी बस संचलन अतिअल्प प्रमाणात सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे पास सेंटर बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता नियमात शिथीलता आल्याने 23 सप्टेंबरपासून पास सेंटर सुरु करण्यात येणार आहेत.
कोरोना काात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी एनएमएमटीचे बस संचलन सुरु होते. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे पास सेंटर बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता टप्प्याटप्प्याने सार्वजनिक वाहतूक पुर्णपणे सुरळित होऊन सर्वसामान्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तथापि सद्यस्थितीत सर्वसामान्य प्रवाशी जनतेसाठी सार्वजनिक बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सुचित केले असल्याने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत टप्प्या टप्प्याने बसेस मध्ये वाढ करून संपूर्ण बस मार्गावरील बससंचलन पूर्ववत करण्यात येत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून दि. 23 सप्टेंबर 2021 रोजीपासून परिवहन उपक्रमाच्या वाशी व सिबीडी या दोन बस स्थानकातील पास सेंटर पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. हे पास सेंटर रविवार व सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त इतर दिवशी सकाळी 08.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत सुरू राहील. सर्व सामान्य प्रवाशी जनतेसाठी तुर्भे, वाशी व सिबीडी बस स्थानक येथील पास सेंटरद्वारे मासिक, त्रैमासिक, वार्षिक इ.प्रकारचे बस पास व जेष्ठ नागरिकांना प्रवास भाडयात देण्यात येणारे सवलतीचे तसेच दिव्यांगासाठी देण्यात येणारे मोफत प्रवासाचे पास उपलब्ध होतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai