कोविड योद्धांना सिडकोच्या एम्पॅनल्ड बँकांकडून कर्ज सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 22, 2021
- 441
नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता आवश्यकतेनुसार सिडकोच्या एम्पॅनल्ड बँकांकडून कर्ज मिळू शकणार आहे. हा निर्णय गृहनिर्माण योजनेकरिता अर्ज करणार्या कोविड योद्ध्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
सिडकोकडून 15 ऑगस्ट 2021 रोजी कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत 4,488 घरांपैकी 1088 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित 3400 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकारिता रु. 2 लाख आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता रु. 2.5 लाख अनामत रक्कम लागू आहे. अनेक अर्जदारांच्या विनंतीनुसार सिडकोने आपल्या एम्पॅनल्ड बँकांशी संपर्क साधून अर्जदारांना अनामत रक्कम भरण्याकरिता आर्थिक सहाय्य करण्याबाबत व्यवस्था करण्यास सुचवले. यानंतर एम्पॅनल्ड बँकांनी संबंधित अर्जदारांना अनामत रकमेचा भरणा करण्याकरिता कर्ज देण्यास अनुकूलता दर्शविली. यानुसार एम्पॅनल्ड बँकांची यादी योजनेच्या हींींिी://श्रेींींशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि, अर्जदार व बँका यांमध्ये या संदर्भात करण्यात येणार्या व्यवहारात सिडकोची कोणतीही भूमिका नसून अर्जदारांनी आपल्या जबाबादारीवर सदर बँकांशी व्यवहार करावा, असे सिडकोकडून कळविण्यात आले आहे.
अर्जदारांना अनामत रक्कमेची जमवाजमव सुलभतेने करता यावी यासाठी सिडकोने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. अर्जदारांनी आपल्या आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्या घराचे स्वप्न साकार करावे.
- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai