नवी मुंबईत 11 नवीन नगरसेवकांचा समावेश होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2021
- 614
नगरसेवकांची संख्या 111 ऐवजी 122
नवी मुंबई : वाढलेली लोकसंख्या तसेच विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात आगामी निवडणुकीत महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील नगसेवकांच्या संख्येमध्ये 17 टक्के वाढ होणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईत महापालिकेत नगरसेवकांची संख्या 111 वरुन 122 एवढी होणार आहे. 11 नवीन नगरसेवकांचा समावेश पालिकेत होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढलेली लोकसंख्या तसेच विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या महानगरपालिकांमधील नगरसेवकांची किमान संख्या 65 तर कमाल संख्या 175 इतकी आहे. तर नगरपरिषदेत किमान संख्या 17 तर कमाल संख्या 65 आहे. लोकसंख्या आणि वस्ती वाढत असल्याने नगरसेवकांची संख्या ही वाढणार आहे. एकसदस्यीय प्रभागावरुन त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती लागु केल्यानंतर आता नगरसेवकांची संख्याही वाढवल्याने निवडणुकांच्या हालचालींना वेग येणार आहे. आता नगरसेवकांची संख्या 111 वरुन 122 करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन 11 नगरसेवकांचा महापालिकेत समावेश होणार आहे.
कोल्हापुरात नगरसेवकांची संख्या 81 वरुन 92 झाली आहे. नवी मुंबईत नगरसेवकांची संख्या 111 वरुन 122, औरंगाबादमध्ये 115 वरुन 126, वसई-विरारमध्ये 115 वरुन 126, नाशिकमध्ये 122 वरुन 133, कल्याण-डोंबिवलीमध्ये 122 वरुन 133, पिंपरी-चिंचवडमध्ये 128 वरुन 139, ठाण्यात 131 वरुन 142, पुण्यात 162 वरुन 173 नगरसेवकांची संख्या वाढली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai