8488 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 10, 2021
- 355
नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणार्या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्या व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे एकूण 8488 विना हेल्मेट दुचाकी चालविणार्या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्यांवर कारवाई केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी वाहनांच्या अपघातांत तसेच त्यातील मृतामध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. यातील बहुतांश अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी वर पाठीमागे बसणार्या व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणे गरजेचे झाले आहे. असे असतानाही अनेक दुचाकी चालक हेल्मेट घालत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणार्या चालकावर 29 ऑक्टोबर पासून विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमे दरम्यान विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱया व्यक्तींवर देखील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी 1300 दुचाकीस्वारांवर, शनिवारी 30 ऑक्टोबर 2100, 31 ऑक्टोबर रोजी 1500, 1 नोव्हेंबर 1300, 2 नोव्हेंबर 1397 तर 8 नोव्हेंबर रोजी 891 अशा एकूण 8488 दुचाकीस्वारांवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्या व्यक्तींवर देखील कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai