एनएमएमटी बसचे सारथ्य महिला करणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2026
- 27
नवी मुंबई ः एनएमएमटी उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 400 महिला भगिनींना बस चालक या पदावर रुजू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. त्याअनुषंगाने प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यामुळे आता एनएमएमटी बसचे सारथ्य लवकरच महिलांच्या हाती पाहायला मिळणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण असल्याचे सांगत या पुढील काळात महापालिका क्षेत्रातील महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल असे स्पष्ट केले. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या एनएमएमटी अर्थात नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात पहिल्या टप्प्यात 400 महिला भगिनींना बस चालक या पदावर रुजू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. या करिता महिलांना बस चालकाचे संपूर्ण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी समाजविकास विभागावर देण्यात आली असून या विभागाच्या माध्यमातून प्राधान्याने नवी मुंबईत वास्तव्य असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचे नवे दालन नवी मुंबईत खुले होणार असून प्रत्येक बाबतीत आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबईच्या उपक्रमांचे अनुकरण इतरही शहरात होईल असा विश्वास सुजाता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai