एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 10, 2021
- 828
मुंबई : कोरोनामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली आहे. त्यांच्या परिक्षेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यसरकार दिलासा देणार आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससी परिक्षेबाबत अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोन वर्ष कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. एक वर्ष मुदतवाढ देण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे ज्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभागाचे दत्ता भरणे यांनी दिली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai